जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा ? किती शुल्क आकारले जाते ? कशी करायची ? jamin mojani arj kute karava.

Ravindra subhash patil
2

जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा ? किती शुल्क आकारले जाते ? कशी करायची ? jamin mojani  arj kute karava.

माणूस हा पैसे कमवण्याचे नवीन नवीन मार्ग शोधून अफाट असा पैसा कमवीत आहे. पैसे कमविणे हि वेगळी गोष्ट आणि पैश्याची गुंतवणूक करणे हि वेगळी गोष्ट होय. माणूस आधी सोने , इतर मौल्यवान वस्तू मध्ये गुंतवणूक करत . परंतु  जागा , शेतजमीन यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. आपण जी जागा किंवा शेतजमीन विकत घेतो . ती जागा किंवा शेतजमीन तितकी प्रत्यक्षात दिसून येत नाही. त्यामुळे शेजारच्याने आपल्या जागेवर किंवा शेतावर अतिक्रमण केले कि काय , जमिनीच्या हद्दीबाबत शंका येते . तेव्हा जमिनीची मोजणी फक्त हा पर्याय उपलब्ध राहतो . तर जमिनीची मोजणी कशी करावी ? जमिनीची शासकीय मोजणीसाठी अर्ज कुठे व कसा करावा ? जमीन मोजणी फी किती लागणार ? जमीन मोजणी साठी लागणारे कागदपत्रे , जमीन मोजणीची  सोपी पद्धत  कोणती असे असंख्य प्रश्न निर्माण होतोत . या सर्व प्रश्नाचे निवारण या लेखात केले आहे ... 

जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा ?जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते ?   मोजणी कशी करायची ? jamin mojani
जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा ? किती शुल्क आकारले जाते ? कशी करायची ? jamin mojani  arj kute karava.

         जमिनीची मोजणी म्हणजे काय ?

जमिनीची मोजणी म्हणजे काय ? तर जागेच्या किंवा जमिनीच्या बांधाबाबत किंवा जमीन प्रत्यक्षात दिसून येत नसल्यास  शासकीय मोजणी करणे गरजेचे असते. आता आपण शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं . या गोष्टी आपण बघणार आहोतच . वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जमीन मोजणीसाठी शासकीय अधिकारी दिलेल्या दिवशी मोजणी येतात व नियमानुसार क्षेत्राची मोजणी करतात त्याप्रमाणे जमीन मोजणी नकाशा ( jamin mojani nakasha )तयार करून हद्दी खुणा गाडतात .अशाप्रकारे जमिनीची मोजणी केली जाते . 

    शेत जमीन मोजणीसाठी अर्ज कुठे करावा ? 

 शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच पारंपरिक पद्दतीने लोकांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात , लोकांना वारंवार कार्यालयात यायची गरज भासू नये म्हणून ऑनलाईन ई -मोजणी द्वारे मोजणीचा अर्ज घरबसल्या संगणकाद्वारे देऊ शकतो .  ऑनलाईन ई -मोजणी अर्ज दाखल केल्यावर ऑनलाईन स्टेटस बघू शकतो .  यामुळे वेळेची , पैशाची , मानसिक ताण कमी होईल . ऑफलाईन जमीन मोजणी अर्ज नमुना खाली पी. डी. एफ. मध्ये उपलब्ध आहे ... 




जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते ?

जमीन मोजणीचा अर्ज कसा भरायचा, ते पाहूया.

"मोजणीसासाठी अर्ज" असं या अर्जाचं शीर्षक आहे. यामध्ये उप -अधिक्षक भूमी अभिलेख व त्याखाली ज्या  तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.
१)  पहिल्या पर्यायापुढे :-
          "अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता" याविषयी माहिती द्यायची आहे. 
२) दुसऱ्या पर्यायात 
          "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील" द्यायचा  आहे. यातील मोजणीच्या प्रकारासमोर "मोजणीचा कालावधी" आणि "उद्देश" लिहायचा आहे. त्यापुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक लिहायचा  आहे.
३) तिसरा पर्यायात 
      "सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम." यासमोर मोजणीसाठी लागणारी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.
जमीन मोजणी फी (शुल्क) jamin mojani fees हि  किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.

जमीन मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात.

 अ ) यात साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते,
 ब ) तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये, 
 क ) अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते.
  • एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये,
  •  तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, 
  • तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क आकारलं जात. 
त्यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती "कालावधी" या कॉलममध्ये लिहू शकतात.
"उद्देश" या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. जसं की शेतजमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा आपला उद्देश शेतकरी लिहू शकतात.


४) चौथ्या पर्यायात
       "सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक" म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.
५) पाचव्या पर्यायात 
      "लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता" लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे.
६) सहाव्या पर्यायात 
       "अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन" दिलेलं आहे.

          शेतजमिनीची मोजणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

  • मोजणीचा अर्ज, 
  • मोजणी फीचं चलन किंवा पावती,
  • 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.
                जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.
                 ही सगळी माहिती भरून झाली की कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे. एकदा का अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत फीड (दाखल) केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.
              त्यानंतर मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.
                 आपल्याला काहीएक अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा ... शेत जमीन , प्लॉट जमीन क्षेत्र मोजणी साठीचा  अर्ज काळजीपूर्वक भरावा . अनुभवी व्यक्तीचे  मार्गदर्शन घ्यावे ....  

टिप्पणी पोस्ट करा

2टिप्पण्या

  1. एखाद्या गटाची अंतर्गत मोजणी करता येते का ? उदा मला माझ्या गटातील ईतर जणांचे क्षेत्र व शेतजमीन कोणती हे हवे तर काय करावे? माझ्या गटात 10 जण हवेत व शेतपट्टी 9 आहेत, प्रत्येक जण म्हणतो तू मोजणी आणुन तुझे शेत शोध, इथेच कुठेतरी असेल, के करावे ? तातडीचा पर्याय काय ?

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा