police station takrar arj namuna in marathi pdf | पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठी pdf
पोलीस म्हंटल कि आपसूक लोकांमध्ये भीती निर्माण होते . लोक म्हणतात पोलीस स्टेशनची पायरी कधी चढू लागू नये . परंतु जगात वावरताना आपल्या कामातून काही लोकांना दुखावले जाते. हक्क मिळवण्यासाठी तसेच अन्याय झाला असेल तर पोलिसात तक्रार करणे गरजेचे आहे . एखादा गुन्हा घडल्यास, एखादी वस्तू हरविल्यास किंवा चोरी झाल्यास पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी लागते. ही तक्रार कशी दाखल करावी याची माहिती असल्यास तुम्हाला तक्रार दाखल करणे सोपे जाईल. तसेच पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठी pdf , पोलीस स्टेशन विनंती अर्ज , police f.i.r format in marathi , अर्ज या पेज उपलब्ध आहे .
जीवनात कधी कुणाशी भांडणतंटा होते, तर कधी हाणामारी ,चोरी, अपघात, खून, विनयभंग तर कधी कुणी जीवे मारण्याची धमकी देतो. तर कधी अश्लील शिवीगाळ करतो . या ना त्या कारणाने पोलीस स्टेशनला तक्रार देण्याची वेळ येत असते. दखलपात्र असलेले व दखलपात्र नसलेले गुन्हे असे गुन्ह्यांचे दोन प्रकार आहेत.
१) अदखलपात्र गुन्हा :- (Non-cognizable offence)
अ )घटना जर अदखलपात्र असलेल्या गून्ह्याची असेल तर पोलीस तशी नोंद फौजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५५ अन्वये अदखलपात्र असलेल्या गुन्ह्यांच्या रजिस्टरमध्ये करून ठेवतात.अशा गुन्ह्यामध्ये पोलीसांना गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करता येत नाही. त्यासाठी तक्रारकर्त्याला न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची सुचना पोलीसांनी दिली पाहिजे, अशी तरतूद आहे. यालाच सर्वसामान्य पणे, एन. सी. नोंदविने म्हणजे (non cognizable offence) नोंदविने म्हणतात.
ब ) आरोपाविरुद्ध चौकशी होऊन त्यांना शिक्षा व्हावी असे तक्रारदार यास वाटत असेल तर , तक्रारदार याने मे . न्यायालयात खाजगी तक्रार आरोपीविरुद्ध दाखल करावी . खाजगी तक्रारीमध्ये योग्य साक्षीदार व पुरावे दिल्यास आरोपीस शिक्षा व दंड होऊ शकतो .
क) पोलिसानी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतल्यावर पोलिसाना चौकशी करण्याचा अधिकार नसतो . अदखलपात्र गुन्हात पोलिसाना चौकशी करायची असल्यास त्यांना मे . न्यायालयाकडून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५५ (२) नुसार चौकशी परवानगी आदेश घ्यावे लागतात.
ड ) अदखलपात्र गुन्ह्यात ज्या शिक्षा २ वर्ष पर्यंत असते. अश्या केसेसला समन्स केसेस म्हणतात.
२) दखलपात्र गुन्हा :-(Cognizable offence)
अ ) जेव्हा तुम्ही दखलपात्र गून्ह्याची तक्रार पोलीस स्टेशनला देता त्याची दखल पोलीस घेतात त्यालाच प्रथम सुचना अहवाल first information report (एफ. आय. आर.)म्हणतात. गून्ह्याच्या तपासाला यामुळेच चालना मिळत असल्याने व पुरावा कायद्यान्वये तक्रारकर्त्याची सत्यता न्यायालयात पडताळतांना या रिपोर्टला महत्वाचे समजले जाते. फौजदारी प्रक्रिया कायद्याच्या कलम १५४ मध्ये याबाबत तरतूद केली असून विविध खटल्यांमध्ये उच्च व सर्वाच्च न्यायालयाने या संदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.
ब ) पोलिसांना दखलपात्र गुन्ह्यात प्रत्यक्ष अटक करण्याचा अधिकार असतो . मे . न्यायालयाची अटक करण्यासाठी कोणतीही परवानगीची गरज नसते . आरोपीला अटक करताना फौजदारी प्रक्रिया संहिता याखाली नियमाचे पालन करायला पाहिजे. अश्या वेळेत आरोपीला अटक पूर्व जमीन घ्यावा लागतो.
क ) दखलपात्र गुन्ह्यात २ वर्षापर्यंत शिक्षा असते. अश्या केसेसला वारंट केसेस म्हणतात.
अटक पूर्व जमीन म्हणजे काय जाणून घ्या 🔝
पोलिसात तक्रार कोण देऊ शकत ?
ज्या व्यक्तीवर अत्याचार झालेला आहे असा व्यक्ती पोलिसात तक्रार देऊ शकतो , तसेच ज्या व्यक्तीस एखाद्यावर झालेल्या गुन्हातबाबत तो साक्षीदार असल्यास तो सुध्दा पोलिसात गुन्ह्याची तक्रार देऊ शकतो . ज्या व्यक्तीने गुन्हा केला आहे अश्या व्यक्तीविरुध्द तुमच्याजवळ सबळ पुरावे असल्यास तुम्ही सुद्धा गुन्ह्याची तक्रार पोलिसात देऊ शकतात.
पोलिसात कुठल्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी
नागरिकाला आपली तक्रार कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये नोंदविता येते. गुन्हा कोणत्याही पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असला तरी, तक्रारदारास पोलिस त्याच हद्दीतील पोलिस स्टेशनमध्ये जा, अशी सक्ती करू शकत नाहीत. तक्रार नोंदवून घेऊन ती योग्य त्या पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यास ( झिरो एफ. आय. आर. ) म्हणतात.
तक्रार देतांना कशी द्यावी ? तक्रार देतांना काय काळजी घ्यावी ?
कायद्यान्वये पोलीस स्टेशनला तक्रार तोंडी किंवा लेखी स्वरुपात देता येईल. तोंडी तक्रार पोलीसांनी लिहून घेतली पाहिजे व तक्रारकर्त्याला वाचून दाखवली पाहिजे. तक्रारकर्त्याने त्यावर सही केली पाहिजे. तक्रारकर्त्याला नक्कलप्रत ताबडतोब विनामूल्य दिली पाहिजे, अशी तरतूद आहे.
पोलीस स्टेशन प्रमुखांनी जर तक्रार घेण्यास नकार दिल्यास काय करावे ?
पोलीस स्टेशन प्रमुखांनी जर तक्रार घेण्यास नकार दिला व त्यामुळे अन्याय झाला असे वाटत असेल तर कायद्यान्वये ज्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला त्यांच्या अप्पर अधिकारी यांच्याकडे तक्रार द्यावी . जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त (जेथे आयुक्त असेल त्या ठिकाणी) यांच्याकडे पोस्टाने तक्रार पाठविता येईल. हे अधिकारी स्वतः गून्ह्याचा तपास करू शकतात किंवा आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यास तपासाचा आदेश देऊ शकतात.
पोलिसानी तक्रार घेण्यास नकार दिल्यास पोलिसाविरुद्ध काय कारवाई करावी ?
पोलीस स्टेशन प्रमुखांनी तक्रार घेतली नाही तर भादंवि १६६अन्वये त्यांच्याविरुध्द कारवाई होऊ शकते. सरकारी कायदा मोडला या गुन्ह्यासाठी कलम भादंवि १६६अन्वये १ वर्षापर्यंत तुरुंग व दंड या शिक्षेची तरतूद आहे. गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप असूनही हलक्या स्वरूपाचा गुन्हा मुद्दाम नोंदविला तर भादंवि १६७ अन्वये सरकारी नोकराने गैर दस्तऐवज तयार करणे यास्तव गुन्हा होईल व यासाठी ३वर्ष तुरुंग किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. किंवा भादंवि. २१७ नुसार शिक्षेपासून कुणाचा बचाव करण्याच्या हेतूने कायद्यातचा भंग केला म्हणून गुन्हा ठरेल व त्यासाठी २वर्ष तुरुंग व दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी,मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम २५ अन्वये प्रशासकीय कारवाई करू शकतात.
तक्रार करताना लक्षात ठेवा खालील गोष्टी
घटनेत दिवस, वेळ, स्थळ, नूकसानीचे वर्णन, उपस्थित व्यक्ति इत्यादि नमूद करावे. तक्रार घटना घडल्यानंतर विनाविलंब नोंदविली पाहिजे. तक्रारीमध्ये घटनेचा महत्वाचा भाग नमूद करायचा राहू नये. तक्रार करण्यास उशीर झाला असेल तर त्याचे योग्य ते कारण नमूद करावे अन्यथा आरोपीला संशयाचा फायदा मिळतो व तो निर्दोष होऊ शकतो. तक्रार ही सत्य असावी.
प्रथम सूचना अहवाल सार्वजनिक दस्तऐवज
न्यायालयाने चन्नपा विरुद्ध कर्नाटक राज्य या खटल्यात प्रथम सूचना अहवाल हे पुरावा कायद्याच्या कलम ७४व ७६ अन्वये सार्वजनिक दस्तऐवज (public document) आहे. हे तपासण्याचा नागरिकांना हक्क आहे. योग्य ती 'फी' घेऊन त्याची प्रत दिली पाहिजे. असे मा. कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे (१९८० क्री. लॉ. ज. पान १०२२)
atishy sundar ttpni
उत्तर द्याहटवाधन्यवाद, लेख वाचल्याबद्दल..
उत्तर द्याहटवामुद्दे सूद मांडणी व लिखाण आहे सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद,
उत्तर द्याहटवासर सामान्यांसाठी खुपच उपयुक्त माहिती दिलीत.धन्यवाद.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवासर बर्याच लोकांना अर्ज लिहितांना चं अडचणी निर्माण होतात कारण बहुतांश लोकांना अर्ज कोणाला अॅड्रेस करावा कुठल्या पोस्ट च्या अधिकाऱ्याला लिहावं तसे नमुना फाॅर्मेट द्यायला हवेत अशी माझी नम्र विनंती आहे
उत्तर द्याहटवाप्रयत्न करेल सर...
हटवा