NI act sec 138 notice format in marathi
आजही व्यवहारात व बाजारात चेकचे महत्व कमी झालेले नाही. कंपनी डीलर कडून उधारीवर घेतलेल्या मालाच्या बदल्यात सुरक्षा म्हणून अनेक चेक घेऊन ठेवतात. बँक कर्जदार यांच्याकडून कर्ज देतांना अनेक चेक सुरक्षापोटी घेऊन ठेवतात . पैसे परत फेड करण्यास व्यक्ती असमर्थ ठरल्यास बँकेत चेक टाकून खात्यात पैसे नसल्यास चेक हा अनादरीत होतो . म्हणजेत चेक बाउन्स cheque bounce होतो . त्यावेळेस नोटीस द्यावी लागते . 138 notice format in marathi pdf. अश्याप्रकाराच्या नोटीसचा ड्राफ्ट या पेजवर उपलब्ध आहे , त्याने नोटीस पाठविणे सोपे जाईल.
ज्याने चेक दिला त्याच्याकडून तोंडी चेक रक्कम घ्या. नाही दिल्यास वकील साहेब यांच्यामार्फत नोटीस पाठवली...
चेक बाउन्स म्हणजे काय ? त्याची कारणे ? काय करायला हवे ? याबाबत सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर दिले आहे .. 👇👇👇
आरोपीस नोटीस पाठवतांना नोटीसमध्ये कोणत्या गोष्टी नमूद करायला हव्यात त्या खालीलप्रमाणे
१) चेक अनादरीत झाल्याची माहिती ज्याच्या खात्यात टाकला आहे . त्यास मिळाल्यावर ३०
दिवसाच्याआत कायदेशीर नोटीस पाठवणे आवश्यक आहे.
२) नोटीस कोणत्या तारखेस पाठवत आहात ती तारीख नमूद करावी, ज्यास नोटीस पाठवायची
आहे त्याचे संपूर्ण नाव , संपूर्ण सविस्तर पत्ता लिहावा.
३) जो नोटीस पाठवत आहे त्याचे संपूर्ण नाव , संपूर्ण पत्ता लिहावा.
४) नोटीस देणारा आणि नोटीस घेणारा यांच्यात कायदेशीर देवाण -घेवाण याचे नातं
असायला हवे.
५)नोटीस देणार व नोटीस घेणार यांच्यात कोणता कायदेशीर देवाण -घेवाणीच व्यवहार
सविस्तरपणे नमूद करावा.
६) कायदेशीर व्यवहारापोटी नोटीस घेणार याने चेक दिला होता असे नोटीसमध्ये यायला हवे.
७)चेक नं ,चेक रक्कम , चेकवरची सही कोणाची , कोणासमोर केली , कोणाच्या नावाने
चेक दिला , कोणत्या बँक शाखेचा चेक दिला , चेक तारीख , सविस्तरपणे नमूद करावे.
८) नोटीस देणार याने कोणत्या खात्यावर वाटण्यास टाकला , कधी टाकला, कधी व काय
कारणाने चेक अनादरीत झाला ते नमूद करावे.
९) चेक अनादरीत झाल्याने नोटीस घेणार याने गुन्हा केला आहे असे नमूद करावे.
१०) नोटीस घेणाराकडून चेक रक्कमची मागणी करावी.
११) नोटीस घेणार याने नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसाच्याआत चेकची रक्कम न दिल्यास
योग्य कारवाई करू असे नमूद करायला हवे.
१२) चेक अनादरीत झाला आहे याची माहिती मिळाल्यापासून ३० दिवसाच्या आत रजि .
पोस्टाने नोटीस घेणार यास पाठवावे.
138 notice format in marathi ।