शेत जमिनीची मोजणी कशी केली जाते ? शेतजमीन मोजावी कशी करतात ? जमीन मोजणीचे सूत्र काय ? अशी करा जमिनीची मोजणी
जमिनीची मोजणी कशी करावी ? याबाबत आजचा लेख आहे. आपण घराच्या घरी जमिनीची , प्लॉटची मोजणी कशी करू शकतो , त्यासाठी जमिन मोजणीचे सूत्र काय ? याबाबत सविस्तरपणे आराखडा या लेखामध्ये जाणून घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊ घराच्या घरी जमिनीची मोजणी कशी करू शकतो ......
घरच्या घरी जमिनीची मोजणी कशी करावी ? जमीन मोजणीचे सूत्र काय ?
जमीन म्हंटल कि हमखास पैसे मिळवून देणारी गुंतवणूक होय . जमीन म्हंटल कि शेती , प्लॉट , साईट ,कंट्रशन , एरिया असे शब्द कानी पडतात . जेव्हा शेतजमीन , प्लॉट विकत घेतो. तसेच घर बांधताना जमिनीचे क्षेत्र कमी येते , त्यावर एखाद्याने अतिक्रमण करून बांधकाम केलेले असते किंवा बांधकाम करणार असतो . जमिनीचे वाद निर्माण होतात . अश्या वेळेस जमिनीची शासकीय मोजणी करण्याची वेळ आपल्यावर येते . जमिनीची शासकीय मोजणीसाठी कुठे आणि कसा अर्ज करावा , त्यासाठी लागणारी फी , त्यासाठी लागणारी कागदपत्रे यांसारखे निर्माण होतात . त्यासाठी खालील लिंकवर सविस्तर माहिती दिली आहे 👇👇
जमिनीसंदर्भात जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा जमिनीचे मोजणीसाठी जमिनीचा आकार आयताकार किंवा चौरसाकार आहे . जमिनीचा आकार हा त्रिकोण , षट्कोन असू शकतो . जमिनीच्या प्रत्येक बाजू असमान आहेत . अश्यावेळेस जमिनीची मोजणी कशी करावी ? आज आपण बघणार आहोत .
जमीन मोजताना गुंठा , बिघा , एकर , हेक्टर म्हणजे काय ते बघूया ....
- १ गुंठा म्हणजे १०८९ चौरस फूट
- १ बिघा म्हणजे ३० गुंठे ( फक्त महाराष्ट्रात )
- १ एकर म्हणजे ४० गुंठे
- १ हेक्टर म्हणजे १०० गुंठे
अ ) जर आपली जमीन आयताकार किंवा चौरसाकार असेल म्हणजेच जमिनीच्या सर्व बाजू किंवा समोरासमोरील बाजूचे अंतर सामान असतील तर ...
१ . सर्वात पहिल्यांदा आपल्या जमिनीच्या बाजूंचे अंतर फुटामध्ये मोजून घ्यावे.
२. यामध्ये जमिनीची लांबी व रुंदी या दोन बाजू असतील त्यांचा गुणाकार करावा.
३ . येणारे उत्तर हे जमिनीचे क्षेत्रफळ असेल. त्या क्षेत्रफळास १०८९ सोबत भागाकार करावा म्हणजे आपली जमीन किती गुंठे आहे हे उत्तर मिळेल .
जमीन मोजणीचे सूत्र (Jamin mojaniche sutra )
क्षेत्रफळ = लांबी x रुंदी
गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ ( चौरस फूट ) / १०८९
एकर = गुंठे / ४०
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
उदा . तुमच्या जमिनीची समोरासमोरील एक बाजू २00 फूट आहे व दुसरी बाजू ३00 फूट आहे. या जमिनीचे क्षेत्रफळ आपण एका सूत्राच्या माध्यमातून काढूया. यासाठी तुम्ही तुमच्या शेताच्या बाजू मोजून घ्या.
क्षेत्रफळ =लांबी x रुंदी
क्षेत्रफळ = २०० *३०० = ६०,००० चौ . फु .
गुंठ्याकडे जमिनीचे क्षेत्रफळ काढुया
गुंठे = जमिनीचे क्षेत्रफळ चौ . फु . / १०८९
= ६०,०००/१०८९
= ५५.०९६
गुंठे ५५ , चौ . फु. ०९ /-
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ब ) जमिनीच्या समोरासमोरील बाजू असमान असतील तेव्हा जमिनीची मोजणी कशी करायची बघूया ....
१) जमिनीच्या सर्व बाजूची मोजणी फुटामध्ये करून घ्यावी .
२) असमान बाजूची मोजणी करून बेरीज करून त्याची सरासरी करावी .
३) जमिनीचे वर नमूद सूत्राप्रमाणे क्षेत्रफळ काढवे .
उदा. पूर्व बाजू २०० फूट , पश्चिम बाजू ३०० , उत्तर बाजू १५० फूट , दक्षिण बाजू ३२० फूट असल्यास ....
१) समोरासमोरील बाजूची बेरीज करून सरासरी करावी .
पूर्व -पश्चिम बाजू सरासरी
पूर्व २०० + पश्चिम ३०० = ५००
५०० ÷ २ =२५० = २५० फूट सरासरी.
पूर्व -पश्चिम बाजू सरासरी = ५०० चौ . फु .
उत्तर -दक्षिण बाजू सरासरी
उत्तर १५० + दक्षिण ३२० = ४७०
४७० ÷ २ =२३५ = २३५ फूट सरासरी.
उत्तर -दक्षिण बाजू सरासरी = २३५ चौ . फु.
त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे एक सूत्र आहे. चौकोनाचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
तर, आपली लांबी आलेली आहे २५० आणि रुंदी सुद्धा २३५ आलेली आहे.
२५० × २३५= ५८७५० चौ.फूट एवढे उत्तर येते.
जर आलेल्या संख्येला आपण १०८९ ने भागले तर आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळते. म्हणजे किती गुंठे आपल्याकडे शेती आहे हे आपल्याला कळून येईल. ५८७५० ÷१०८९ = ५३. ९४ गुंठे एवढे उत्तर मिळते. म्हणजेच आपली जमीन जी आहे ती ५३ गुंठे एवढी आहे. तरीही अगदी सोपी साधी पद्धत होती. चार बाजूसाठीही पद्धती होती.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता आपण जर तुमची जमीन Jamin Mojani कशीही असो तुम्ही स्वतः मोजणी करू शकता .
क ) जमीन त्रिकोणी असेल किंवा तीन बाजूची असेल तर त्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते आपण पाहूया
जेव्हा जमीन हि त्रिकोणी असेल , जमिनीला तीन बाजू असतील अश्यावेळेस पुढील सूत्र वापरायचे आहे .
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1\2×पाया×उंची
पहिल्यांदा उंची मोजायची आणि नंतर त्याची पाया मोजायचा आणि या सूत्रांमध्ये तुमच्या जमिनीच्या पायाची लांबी आणि उंची टाका किंवा फुटामध्ये असेल तर ते टाका.
आपण एक उदाहरणाच्या सहाय्याने येथे सोडवण्याचा प्रयन्त करूया...
जमिनीचा पाया हा १०० फूट आहे आणि त्याची उंची४०० फूट आहे. तर दोघांचा गुणाकार करून त्याला दोन्ही 2 ने भागायचे म्हणजेच
=४०० × १०० ÷ २
=४००००÷ २
=२०००० चौ.फूट
आपल्याला उत्तर मिळते आता याचे जर आपल्या गुंठ्यामध्ये रूपांतर करायचे असेल तर याला पुन्हा १०८९ ते भागयचं ते त्याचे उत्तर आपल्याला गुंठ्यामध्ये मिळून जाईल.२०००० ÷१०८९ = १८. ३६ गुंठे. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या जमिनीचे मोजमाप करू शकता.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शेत जमिनीची मोजणी कशी करावी ? शेतजमीन मोजणीचे सूत्र काय ? याबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयन्त या लेखात देण्यात आलेला आहे . काही उणीव राहिल्यास किंवा आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स विचारावेत ....