१ ) पोटगी म्हणजे काय ? Potagi mhanje kay ?
पोटगी म्हणजे काय ? तर विभक्त होणे किंवा घटस्फोटानंतर( Dirvoce ) जोडीदार किंवा माजी जोडीदाराला दिलेली नियमित किंवा एकरक्कमी ठरल्याप्रमाणे दिलेली रक्कम म्हणजेच पोटगी (potagi )होय .
अशी पोटगी पती हा पत्नीला देऊ शकतो. किंवा पत्नी हि पतीला देऊ शकते. पोटगी याला इंग्लिश मध्ये Alimony असे म्हणतात .
२ ) पोटगीचा अधिकार म्हणजे काय? Potagicha Adhaikar Mhanje Kay ?
भारतात पती किंवा पत्नी यांच्यात वाद निर्माण झाले . त्यात पत्नीला काही कारणास्तव माहेरी हाकलून दिले. आणि ती स्वतःचा आणि मुलाबाळांचा सांभाळ ,उदरनिर्वाह स्वतः करण्यास समर्थ नसेल . तसेच पतीला चागले कमाईचे साधन नसेल , किंवा पती हा अपंग असेल . स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल . अश्या वेळेस हिंदू विवाह कायदा, 1955 चे कलम 25(Hindu Marriage Act Sec 25) नुसार कायमस्वरूपी पोटगी आणि भरणपोषणाशी संबंधित आहे. त्यात असे नमूद केले आहे की न्यायालय डिक्री पास करताना, डिक्री पास केल्यानंतर, आणि पत्नी किंवा पतीकडून अर्ज केल्यावर. प्रतिवादीला(पती किंवा पत्नी ) अर्जदाराला(पती किंवा पत्नी ) देखभाल खर्च देण्याचे आदेश देऊ शकते:
३ ) पोटगी किती दिवस द्यावी लागते? potagi kiti divas dyavi lagate ?
मे . कोर्टाने आदेश केल्याप्रमाणे एकरक्कमी (One Time ), मासिक(Monthly ) किंवा नियतकालिक रक्कम( किंवा आदेश केल्याप्रमाणे ) आणि अर्जदार जो पर्यंत जिवंत आहेत.तो पर्यंत न्यायालय प्रतिवादी यास अर्जदाराला पैसे देण्याचे आदेश देऊ शकते
४ )पोटगी का दिली जाते? potagi ka dili jate ?
पोटगी, ज्याला देखभाल किंवा पती-पत्नी समर्थन म्हणूनही ओळखले जाते, भारतातील पती/पत्नीला आर्थिक विषमता दूर करण्यात मदत करण्यासाठी आणि विभक्त झाल्यानंतर किंवा घटस्फोटानंतर एक सभ्य जीवनमान सुनिश्चित करण्यासाठी दिले जाते :
अ ) नोकरीच्या संधींचा त्याग करणाऱ्या पत्नींना पाठिंबा देण्यासाठी
पोटगीकडे त्या पत्नींना पाठिंबा देण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते ज्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी आणि लग्नासाठी करिअरच्या संधी आणि आर्थिक स्वातंत्र्याचा त्याग केला असेल.
ब )समान राहणीमान राखण्यासाठी
जर पत्नी नोकरी करत असेल परंतु तिच्या पतीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी कमावत असेल, तर तिला समान जीवनमान राखण्यासाठी पोटगी दिली जाऊ शकते.
क ) पत्नीचे वय, शिक्षण, कमावण्याची क्षमता यांचा विचार करणे
जर पत्नी काम करत नसेल तर कोर्ट पोटगीची रक्कम ठरवताना तिचे वय, शिक्षण आणि कमावण्याची क्षमता विचारात घेईल.
ड ) तिच्यावर अवलंबून असल्याल्याचे शिक्षण , लग्न , आरोग्य यासाठी .
पती किंवा पत्नी कडे मुले असतील तर त्याचे शिक्षण ,आरोग्य, लग्न अश्या गोष्टी पूर्ण करण्याच्या जबाबदाऱ्या असतात .
यासह: दोन्ही जोडीदारांचे उत्पन्न, त्यांचे राहणीमान, त्यांची आर्थिक स्थिती, त्यांची निव्वळ संपत्ती आणि प्रत्येक व्यक्तीची आर्थिक गरज यानुसारच पोटगीची रक्कम निश्चित केलेली नाही आणि ती अनेक घटकांवर आधारित आहे . यावरील कारणामुळे पोटगी दिली जाते .
५ )पत्नीला किती पोटगी मिळते ? तसेच भारतात पोटगी कशी ठरवली जाते?
पत्नी असो वा पती मे . न्यायालय हे खालील गोष्टीचा विचार करते . पती किंवा पत्नीला पोटगी देतांना ते खालीलप्रमाणे :-
न्यायालय पत्नीला भरणा (देखभाल) देण्याचा निर्णय घेतो तेव्हा खालील आधारांवर तो निर्णय घेतला जातो:
अ )**कायदेशीर जबाबदारी**: अनेक न्यायालयांमध्ये पतीला पत्नीला आर्थिक सहाय्य देण्याची कायदेशीर जबाबदारी असते, विशेषतः जेव्हा ते वेगळे किंवा घटस्फोटित असतात. हा आधार विवाहाच्या दरम्यान दोन्ही पती-पत्नीने एकमेकांना समर्थन देणे आवश्यक आहे या तत्त्वावर आधारित आहे.
ब ) **आर्थिक गरज**: न्यायालय पत्नीच्या आर्थिक गरजांचा आढावा घेतो. यामध्ये तिच्या जीवनाच्या खर्च, वैद्यकीय गरजा आणि इतर कोणत्याही आर्थिक जबाबदाऱ्या समाविष्ट असतात. जर पत्नीने आर्थिक सहाय्याची आवश्यकता दर्शवली, तर न्यायालय भरणा मंजूर करण्याची शक्यता वाढते.
क ) **पतीची देयक क्षमता**: न्यायालय पतीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करतो. जर त्याच्याकडे आर्थिक सहाय्य देण्याची क्षमता असेल आणि त्याला त्याच्या स्वतःच्या जीवनावर अत्यधिक ताण येणार नाही, तर न्यायालय भरणा देण्याचा आदेश देऊ शकते.
ड ) **विवाहाची कालावधी**: विवाहाची कालावधी न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकते. दीर्घकालीन विवाहांमध्ये भरणा मंजूर होण्याची शक्यता अधिक असते, विशेषतः जर पत्नी पतीवर अवलंबून असेल.
इ) **जीवनशैली**: न्यायालय विवाहाच्या दरम्यान स्थापन केलेल्या जीवनशैलीचा विचार करतो. पत्नीला विभाजनानंतर समान जीवनशैली राखण्यासाठी भरणा देण्याचा उद्देश असतो.
फ ) **विवाहातील योगदान**: पत्नीने केलेले आर्थिक नसलेले योगदान, जसे की घरगुती कामे, मुलांची देखभाल किंवा पतीच्या करिअरला समर्थन देणे, याचा विचार केला जातो.
ग )**वय आणि आरोग्य**: दोन्ही पक्षांचे वय आणि आरोग्य देखील महत्त्वाचे असू शकते. जर पत्नी वयोवृद्ध असेल किंवा तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे काम करण्यास अडचण येत असेल, तर हे भरण्यासाठी तिच्या दाव्याला आधार देऊ शकते.
ह )**मुलांची देखभाल**: जर मुलं असतील, तर न्यायालय मुलांच्या देखभालीच्या व्यवस्थापनाचा विचार करतो. मुलांच्या पालनपोषणाच्या आर्थिक गरजा भरण्यासाठी पत्नीला भरणा देण्याची आवश्यकता असू शकते.
य ) **पक्षांचे वर्तन**: काही प्रकरणांमध्ये, विवाहाच्या दरम्यान पक्षांचे वर्तन विचारात घेतले जाऊ शकते, विशेषतः जर एका पक्षाचे वर्तन विवाहाच्या विघटनास कारणीभूत ठरले असेल.
ज ) **कायदेशीर चौकट**: भरणा ठरवण्यासाठी संबंधित न्यायालयाच्या कायद्यांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. विविध न्यायालयांमध्ये भरणा ठरवण्यासाठी वेगवेगळे निकष आणि सूत्रे असू शकतात.
वर घटकाचा विचार करता जर जोडीदाराला उत्पनाचे स्रोत म्हणून पगार किंवा पेन्शन असेल तर त्या पगार किंवा पेन्शन च्या 25 % दरमहा पोटगी मिळू शकते .. एक न्यायनिर्णय आहे तो खालीलप्रमाणे :-
Matapher vs state of u.p.(2024)
जर पगार किंवा पेन्शन नसेल उत्पनाचे दुसरे साधन म्हणून शेती , व्यवसाय , हात मजुरी असल्यास मे . न्यायालय योग्य तो आदेश देऊ शकतात.
 |
mahila atyachar pratibandhak kayada 2005 |
६ ) नवरा पोटगी मागू शकतो का?
हो , नवरा हो पत्नी कडून पोटगी मागू शकतो. पत्नी हि पतीपेक्षा जास्त कमवत असेल , पतीला उत्पनाचे स्रोत नसेल तर पती पोटगी मागू शकतो ... हिंदू विवाह कायदा 1955 कलम 25 नुसार पती किंवा पत्नी मे . न्यायालयात पती किंवा पत्नी पोटगी मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात . दोघे पक्षांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे . त्यासाठी खालील न्यायनिर्णयाचा आधार घेऊ शकतात .
bombay High Court.. Bhagyashri v. Jagdish... (2022)
७ ) नोकरी करणाऱ्या पत्नीला भारतात पोटगी मिळू शकते का?
हो , मिळू शकते . जर पत्नी हिस पतीपेक्षा नोकरीतून कमी उत्पन्न मिळत असल्यास . न्यायालय विवाहाच्या दरम्यान स्थापन केलेल्या जीवनशैलीचा विचार करतो. पत्नीला विभाजनानंतर समान जीवनशैली राखण्यासाठी भरणा देण्याचा उद्देश असतो.
८ ) बायको किती पोटगी मागू शकते?
पत्नी हि कितीही पोटगी मागू शकते . परंतु वर सांगितल्याप्रमाणे जे कशी कारणे आहेत पोटगी मंजूर करण्याचे त्या कारणाचा योग्य तो विचार करून मे . न्यायालय पोटगी मंजूर करते .
९ ) एकरकमी पोटगीची गणना कशी केली जाते?
याचे उत्तर प्रश्न करा . ५ मध्ये दिल्याप्रमाणे आहे , त्यावर जाऊन वाचावे .
१ ० ) कायमस्वरूपी पोटगी कधी दिली जाऊ शकते?
ज्यावेळी पती आणि पत्नी यांच्यात दोघाच्या समंतीने निर्णय घेऊन , तसेच जोडीदारास मासिक पोटगी देणे शक्य होत नाही तेव्हा ....कायमस्वरूपी पोटगी दिली जाते .
 |
फ्री मध्ये वकील कसा मिळवावा ... |
१ १ ) कायम पोटगीचा अर्थ काय?
याचा अर्थ असा कि , पती किंवा पत्नी यामध्ये ठरल्याप्रमाणे एकरक्कमी कायमस्वरूपी साठी घटस्फोट झाल्यानंतर लगेच पोटगी दिली जाते . त्यानंतर पती किंवा पत्नी हे सर्व हक्काचा त्याग करतात .त्यानंतर भविष्यात कोणत्याही कारणासाठी पोटगी देण्याची आवश्यकता राहत नाही ....
आपल्याला लेख कसा वाटला तसेच आपल्या काही शंका असल्यास आम्हाला कंमेंट मध्ये सांगा . आपल्या शंका आणि संशयाचे समाधान करण्याचा प्रयन्त करेल ....धन्यवाद ......